Reply – ईअरफोन
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
ईअरफोन
— by Parnika Raut Parnika Raut
ईअरफोन                -पर्णिका

         "काय सारखं सारखं कानात घालून असतेस? कान दुखत नाहीत का? मी काय बोलतेय त्याकडे लक्ष आहे का तुझं???..."असे संवाद आजकाल सर्वांच्याच घरात आपल्याला ऐकू येतात...आणि आपण सर्रास आई-बाबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून,मोबाईल मध्ये बुडालेलो असतो...
पण काल, फेसबुक वर एक व्हिडीओ पाहिला...त्यात असं दाखवलं होतं की ईअरफोन मुळे ईअरड्रम खराब होऊन नंतर त्याचा कानाला त्रास होतो...ते पाहून आश्चर्य वाटलं...बापरे! मी तर रोजच ईअरफोन वापरते...तेव्हा पुढचा धोका टाळण्यासाठी ''आजपासून ईअरफोन वापरायचे नाही.'' असं ठरवलं....
        दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजला जायची तयारी...पहाटे बस मधून प्रवास करताना मस्त थंडगार वारा अंगावर येत होता...तेव्हा गाणी ऐकायचा मोह टाळून मी स्टेशन वर पोहचले...ट्रेन यायला अजून अवधी होता.मी तशीच बाकावर बसून फेसबुक-इंस्टा चेक करू लागले...बाजूला बसलेल्या बायका बोलत होत्या.."नवऱ्याने तिचे केस कापले...सासूने तिला घराबाहेर काढलं..." एक क्षण विचार केल्यानंतर मला समजलं,की त्या सीरिअल च्या गप्पा होत्या!तसेच ट्रेन उशिरा असल्याने काही जण ट्रेनला शिव्या देत होते.अधून मधून येण्याजाणाऱ्या ट्रेन चा काळीज धस्स करणारा आवाज..पुन्हा पुन्हा अनावश्यक असलेल्या आनाऊंसमेंट चा आवाज...असे अनेक आवाज,ईअरफोन नसल्याने नव्याने ऐकु येत होते...
ट्रेनमध्ये चढल्या चढल्या,जागेवरून वाद सुरू झाला बायकांचा...त्यांचा गोंगाट ऐकून नकळत माझा हात ईअरफोन कडे सरावला,पण मला माझ्या प्रतिज्ञेची आठवण झाली..समोर बसलेली जवळ जवळ सर्वच मंडळी कानात ईअरफोन टाकून बसली होती....मी तशीच खिडकीतून मागे पळणाऱ्या झाडांकडे पाहत,माझ्या तंद्रीत बसले...पण ही तंद्री जास्त वेळ लागली नाही. "भेल-भेल,वडापाव-वडापाव"असे तालासुरात आवाज चालू झाले...तसेच फणी-काना-गळ्यातलं विकणारीसुद्धा तेथे हजर.ती नेहमीच असते या ट्रेन मध्ये,पण ती मोठया मोठ्याने कर्कश आवाजात काय बोलत असते ते अजूनही मला समजलेले नाही..सोबत बादशा मसाला चं बॅग्राउंड म्युसिक सुद्धा चालू झालं..तितक्यात पेरू आणि बाम विकणाऱ्या काक्या आल्या...या सर्वांच्या गोंधळात डोकं जड होऊ लागलं होतं...हे सर्व विकणारे माझ्याच ट्रेनला का असतात?? आणि माझ्या बाजूला आल्यावरच यांना कर्कश आवाजात स्वर लावावासा वाटत असेल का??
तशाच रागात मी ट्रेन मधून उतरले.कॉलेजला जाण्यासाठी रिक्षा पकडली.आता तरी शांतता मिळेल असा विचार येतो न योतो तोच बाजूला बसलेल्या लहान मुलाने मोठ्या मोठ्या ने रडायला सुरवात केली.आणि त्याची आई त्याला रडण्यापासून थांबवतेय की अजून रडवतेय तेच मला समजत नव्हतं! त्यात रिक्षावाल्याने  मोठ्या आवाजात भोजपुरी गाणी चालू केली,त्यामुळे डोकं अजूनच ठणाणू लागलं.
        कॉलेज मध्ये आल्यावर जरा हायसं वाटलं.वर्गात गोंगाट असला तरी त्या कर्कश आवाजांपेक्षा नक्कीच सुखकारक होता तो! वर्गात असाईनमेंट छापताना पुन्हा मला माझ्या ईअरफोन ची आठवण झाली...
घरी येताना पुन्हा ट्रेन मध्ये "अमुक अमुक चा नवरा मेला,आणि मिळालेले पैसे घेऊन तीने अमुक अमुक इथे मोठा फ्लॅट घेतला" वगैरे वगैरे आवाज कानावर येत होते.या ईअरफोन न वापरायच्या नादात सकाळपासून डोकं अगदीच फिरलं होतं.त्यात ट्रेन मध्ये गर्दी!...तितक्यात समोर एका माणसाने मोठ्या स्पीकर वर, कोणत्या तरी न समजणाऱ्या भाषेत मुव्ही पाहायला चालू केला..बाजूच्या सर्वांनाच त्याचा त्रास होत होता...शेवटी न राहून मीच त्याला रागात म्हणाले "हेडफोन लावा ना!" आणि माझंच मला हसू आलं!
घरी जाताना पुन्हा संध्याकाळची वेळ..बस..खिडकी...आता मात्र माझा गाणी ऐकण्याचा मोह मी आवरू शकले नाही.बॅगेतले ईअरफोन काढून मस्त सलीलचं गाणं लावलं..''ऐसे काही व्हावे..मन शांत निजावे....''
       हल्ली आपण मुड नुसार हवी ती गाणी-हवी तिथे ऐकत असतो,एखाद्याचं बोलणं इग्नोर करताना,आईच्या सीरिअल्स चालू असताना मोबाईलवर मुव्ही बघताना,प्रवासात सिरीज बघताना,जिम मध्ये व्यायाम करताना,जॉगिंग करताना...कित्ती कित्ती ठिकाणी आपण हेडफोन वापरतो!!
        हवं तर,मी कमी आवाजात गाणी ऐकेन,पण ईअरफोन्स  शिवाय तर मी जगूच शकत नाही!!
हल्ली कुठे बाहेर प्रवासाला जायचं असेल तर एकवेळ घड्याळ राहिलं तरी चालतं,पण ईअरफोन हवेतच!! नाही का???