Reply – करार
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
करार
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
#करार

ना ओघळायचे पुन्हा;
केला विचार होता,
माझ्यासवे आसवांचा;
हा झाला 'करार' होता..

मग कशी फितुर झालीस..
तू तुझ्या बंधनांना..
का हा नव्या दग्याचा..
तुझा ' निखार ' होता..

ना ओघळायचे पुन्हा;
केला विचार होता.

आता कुठे जरासा..
तुला विसरु पाहत होतो;
दूर तुझ्या पासूनी..
एकटा रहात होतो,

पण तू पुन्हा येवूनी..
केला स्विकार होता,
माझ्याच यातनांचा..
जणू हा शिकार होता..

ना ओघळायचे पुन्हा;
केला विचार होता,
माझ्यासवे आसवांचा;
हा झाला 'करार' होता..

@शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar