Reply – ॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar

आज थोडं थकल्यासारखं वाटतंय

एक ओझं, जे माझं कि तुझं

तो वरचाच जाणे

माझ्याच खांद्यावर आल्यासारखं वाटतंय

ते पाप होतं कि पुण्य होतं

तेपण तोच जाणे

पण त्या श्रापांच्या दग्धअग्नीत

मलाच जळाल्यासारखं वाटतंय

बोलतोय मी , पाहतोय मी

आजूबाजूला घडणारे सारे

ओळखतोय मी ते बदल कालानुरूप होणारे

करतोय मीमांसा मी माझ्याच अस्तित्वाची

बोट दाखवूनही पलीकडं ,

सारं माझ्याकडेच आल्यासारखं वाटतंय

मी थकलोय,  तरीही उठतो अन अखंड शोधतो मलाच स्वतःला

शोध घेऊनही सापडत नाही

आत खोलवर कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय

आठवणींची मशाल पेटवूनही काहीच आठवत नाही

वणव्यात सारं काही जळाल्यासारखं वाटतंय

फक्त हे शरीर उभे नावाला

बाकी सारं काही संपल्यासारखं वाटतंय

आज थोडं थकल्यासारखं वाटतंय ...सिद्धेश्वर विलास पाटणकर

पाटणकर सिद्धेश्वर विलास