Reply – ती जशी जशी जुनी होत गेली
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
ती जशी जशी जुनी होत गेली
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar
ती जशी जशी जुनी होत गेली

हळूहळू माझी सोनी बनत गेली

वाईनवानी पहिली कडुशार होती

नंतर मधाचे पाणी बनत गेली

रंगढंग बघूनच तर जवळ गेलो होतो

खटके उडायचे अधूनमधून

नंतर मात्र नवीन कहाणी घडत गेली

या एकल्या जीवाची ती राणी बनत गेली

आधी जे मिळेल ते खायचो नि राहायचो

मग हवी होती कशाला ती बायको ?

डोळे सताड उघडे असायचे, राव

या डोळ्यांचीच ती हळूहळू पापणी बनत गेली

कधी आत हृदयात बसली ते समजलंच नाही

अंगात सळसळणाऱ्या रक्ताची वाहिनी बनत गेली

मित्रा ,, माझी बायको आधी मला नकोशी होती गड्या

आता मात्र माझ्यासाठी अमृत संजीवनी ठरत गेलीय ...


सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास