Reply – सल
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
सल
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
"#सल.."

तू ना.. बाहेर आणि आत..
नेहमीच वेगळा जगतोस,
जगासमोर अगदी सभ्य..
आणि माझ्याशी का रे
Rudely वागतोस..!

आधी कसा रे..
माझ्या मागे मागे असायचास;
पण आता मात्र छोटया छोटया
गोष्टींवरुन भांडायला लागतोस..

जगासमोर अगदी सभ्य..
आणि माझ्याशी का रे
Rudely वागतोस!

माझी कुठली ही गोष्ट..
तुला चिडचिड वाटते,
आणि कुठल्याही  गोष्टीत
तुला माझीच चुकी दिसते..
माझा तुला दुखवण्याचा..
कधीच हेतू  नसतो रे,
फक्त तुझ्या काळजी पोटी..
मनामध्ये नेहमीच भिती दाटते!

हं.. कळतयं मला माझ्यात आता..
पहिला Charm राहिला नाही,
Actually अगदी मनापासून माझा चेहरा..
मी आरशात सध्या पाहीलाच नाही.

खरं सांग.. म्हणून तर नाही ना?..
माझ्यापासून तू दूर जावू पहातोस..
जगासमोर अगदी सभ्य..
आणि माझ्याशी का रे
Rudely वागतोस!

माझा भास.. माझी आस
तुला नक्की कळून येईल..
आणि ते समजून घेण्यासाठी;
मी अंता पर्यंत वाट पाहीन!
पण हे उमजून येण्यासाठी..
Please माझा अंत पाहू नको,
कारण तुला ते वेळीच कळून नाही आलं..
तर मी मात्र कोलमडून जाईन!

छोटीशीच जागा हवी रे तुझ्या मनात..
बघूया याला तरी का तू जागतोस..
जगासमोर अगदी सभ्य..
आणि माझ्याशी नेहमी
Rudely वागतोस!!!

- शशांक कोंडविलकर
#Hashtagथोडसंमनातलं
Shashank kondvilkar