Reply – निसर्गरम्य संध्याकाळ
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
निसर्गरम्य संध्याकाळ
— by Ravikolhal Ravikolhal
निसर्गरम्य संध्याकाळ
                 रविराज कोल्हाळ(8605974175)
एका निसर्गरम्य अशा संध्याकाळी वाटतं,
तू मला मिठीत घ्यावं ,
ना पक्ष्यांचा आवाज,
ना लोकांची वरदळ,
वाहत राहावा वारा,तो हि मंद आणि नितळ,
तेवढ्यातच अचानक व्हावा ढगांचा गडगडाट,
आणि चमकावी वीज,
त्या विजेच्या लख्ख प्रकाशामध्ये,
तुझाच चेहरा दिसावा,
बाकी सगळीकडे अंधार असावा,
या अशा निसर्गरम्य संध्याकाळ वाटतं,
तू मला मिठीत घ्यावं.......||१||
का कोण जाणे कुणाच ठाऊक,
तू मला आणि मी तुला नजरेनेच बोलावे,
अबोल त्या क्षणी,
डोळ्यात माझ्या तू आणि तूच असावे,
या निसर्गरम्य संध्याकाळी वाटतं,
तू मला मिठीत घ्यावे.....||२||
तू हळूच आता ओठ उघडावे,
मी तुझ्या त्या ओठांवर अलगद बोट ठेवावे,
नको बोलूस तू या क्षणी,
असे मी नजरेतून सांगावे,
अशा या निसर्गरम्य संध्याकाळी वाटतं,
तू मला मिठीत घ्यावे......||३||
खूप काही बोलायचे आहे तुला,
हे मी तू न बोलताच ओळखावे,
पण तरीही तुझ्या या गुलाबी ओठांना मी स्तब्ध करावे,
या निसर्गरम्य संध्याकाळी वाटतं,
तू मला मिठीत घ्यावे......||४||