Reply – ‘ती’ दुस-याबरोबर बिझी आहे
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
‘ती’ दुस-याबरोबर बिझी आहे
— by Amol Umbarkar Amol Umbarkar
‘ती’ दुस-याबरोबर बिझी आहे

ही पण माझी आहे अन् ती पण माझीच आहे
नको ‘ती’ मागे लागून लागून राजी आहे
पण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.

प्रेमयुगलाकडे पाहिलं की, वाटतं आज ही या जगात नाझी आहे
प्रेमाचा फिव्हर आहे सगळ्यांवर सगळेच इकडे क्रेझी आहे
पण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.

टवाळगिरी करताना मैत्रीचे बंध मी तंतोतंत जपावे
तरी ही मी तुझ्या आठवात का, सांग रोज झुरावे
काँलेजच्या कट्ट्यावर विषय निघावे, तर समजते
या प्रेमात कोणाची डाँक्टरेट आणि पीजी आहे
पण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.

एकटं जगताना ही तुझ्या स्वप्नात जगावं
शहाण्या सरत्यानं का सांग खुळ्यासारखं वागावं
लोकांनी विचारलं तर मी छातीठोकपणे सांगावं की,
ती फक्त माझी आणि माझीच आहे
पण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.

रोज पाहावं तुला आणि उगाच खुश व्हावं
हसावं तुझ्यासाठी आणि आठवात तुझ्या रडावं
तुझ्या तिरस्कारतलं प्रेमसुद्धा मला आज राजी आहे
पण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.

डोळ्यात स्वप्न असावी, क्षणोक्षणी तुला स्मरावे
रोज एकल्यानेच सांग का, मी तिळतिळ तुटून मरावे
लोक म्हणतात आजकाल प्रेम करणं खूप ईझी आहे
पण मला जी पाहिजे ‘ती’ मात्र कोणा दुस-याबरोबर बिझी आहे.

कळते मला तुझे हे वागणे, मी ही आता बोलायला तयार आहे
भावनांच्या पावसात तुझ्या, माझ्याही आसवांची धार आहे
एकदा म्हण तू फक्त ‘तू  आवडतेस मला’
मग मी साता जन्मासाठी फक्त आणि फक्त तुझीच आहे.
आता सांग जगाला तुला जी पाहिजे ‘ती’ तुझ्यासोबतच बिझी आहे.

अमोल उंबरकर