Reply – सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता...
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता...
— by vadatar vadatar
सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता...

आता कशाला पावसा
तू उगाच कोसळतोस
उभी राहिली पिके ही
का त्यांना भिजवतोस

नक्षत्रे पावसाची सारी
संपली ती आता रे
सरला आश्विन आता अन्
आली आली दिवाळी रे

असा अवेळी तू येता
उडे खूपच धांदल
मेघ गर्जना विद्युत
काळे काळे हे बादल

नको रागाने बरसू
नको आणू रोगराई
दिवस  सण उत्सवाचे
आहे लगबग घाई

निरोप घेऊन धरणीचा
पुढल्या वर्षी रे तू यावे
आगमन होईल शिशिराचे
तू आता उगी राहावे

-- शब्दांकित (वैभव दातार )