Reply – आकाशरंग
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
आकाशरंग
— by vadatar vadatar
दिवसाच्या विविध वेळांमध्ये दिसणारे आकाशाचे रंग  प्रस्तुत कवितेत लिहिले आहेत        

  ||    आकाशरंग  ||

झुंजूमुंजू  झाले आकाश  लालरंग  ल्याले
कोवळ्या सुंदर किरण वर्षात अंबर आज न्हाले

अन्न शोधण्या पिलांना आकाशी झेपे पक्षी
उडती एकमेका साथीने उमाटे नभावरी नक्षी

हळूहळू  ऊन वाढे आकाशी वाहती उष्ण वारे
पिवळ्या तेजाच्या गोळ्यात लुप्त होती चंद्र तारे

सूर्य तापे स्वउर्जेने घेई कवेत आकाश
म्हणे चराचर सृष्टीला जगण्या देतो मी प्रकाश

जेव्हा जाई सूर्य अस्ताला तेव्हा होई सांजवेळ
नाभी ढगांची होई दाटी खेळे पाठशिवणीचा खेळ

करी मावळतीची किरणे कडा ढगांच्या सोनेरी
जणू केशराचे कां नाभी पसरले चौफेरी

रात्र चढते चढते नाभी काजल भारे निशा
कधी सरेल हि राती कधी होईल मग उषा

नाभी टिपूर चांदणे पसरे चंद्र हा  एकला
तारे ग्रह नक्षत्रांची बांधे कटावरी मेखला  

दिवसाच्या वेळासंगे रंग बदलती नभाचे
आकाशीचा ईश रक्षण करी ह्या विश्वाचे


---- शब्दांकित (वैभव दातार )