Reply – आज गणपती विसर्जनाचा दिवस असून भक्तमंडळी साश्रू नयनांनी गणरायाला निरोप देत आह...
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
आज गणपती विसर्जनाचा दिवस असून भक्तमंडळी साश्रू नयनांनी गणरायाला निरोप देत आहेत. त्या अनुषंगाने केलेली कविता...
— by vadatar vadatar
आज गणपती विसर्जनाचा दिवस असून भक्तमंडळी साश्रू नयनांनी गणरायाला निरोप देत आहेत. त्या अनुषंगाने केलेली कविता...


अंतिम दिन आज उत्सवाचा
निरोप देऊ गणराया
ढोल ताशे गर्जती नादे
पुढच्या वर्षी लवकर या ||1||

बारा दिवस तन मन काया
सेवा करिता तुम्ही मोरया
कृपा करूनिया भक्तांवरती
नष्ट करा तुम्ही मोह माया ||2||

मखरात बसवुनी तुजला देवा
सेवितो आम्ही तुज भक्तिभावा
नृत्य गायन आनंदाचा ठेवा
कृपावर्षाव अखंड असू द्यावा ||3||

निरोप घेतो मन गहिवरले
हृदय आमुचे हेलावले
विसर्जनाला तुझ्या गणेशा
डोळे अश्रूंनी पाणावले ||4||

निवारूनी अमुची विघ्ने आपदा
संकटी रक्षी आम्हा सर्वदा
अनादि अंत तू असशी मोक्षदा
वैभव नमितो तव पूज्यपदा ||5||


--शब्दांकित (वैभव दातार )