Reply – उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मी खलील कविता केली आहे
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मी खलील कविता केली आहे
— by vadatar vadatar
||शिक्षकदिन||

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
जन्मदिवस करू साजरा
प्रेमभराने नमन शिक्षकांना
प्रणाम अमुचा स्वीकारा ||१||

बाळगोपाळ शाळेत जाती
बालवाडीमध्ये प्रवेश घेती
खेळ गोष्टी बडबडगीते
शिकविती आम्हा ताई ||२||

प्राथमिक शिक्षणाने बालमने घडती
बाई मुळाक्षरे पाढे शिकविती
ओल्या मातीसम बालमने असती
आकार त्यांना शिक्षक देती ||३


माध्यमिक शिक्षण घेता घेता
मोठे होतो आम्ही आता
कसे जगावे शिक्षण देती
शिक्षक जीवनमूल्ये देती ||४||

महाविद्यालयांत प्राध्यापक असती
ज्ञानभांडार आम्हावरी रिते करिती
विविध कौशल्ये आत्मसात करुनिया
आम्हाला 'माणूस' घडविती ||५||

वंदन करूया सादर नमूनी
शिक्षकांना आज 'शिक्षक दिनी'
भाव जपावा कृतज्ञतेचा
विद्यार्थ्यांनी आपुल्या मनी ||६||

-- शब्दांकित (वैभव दातार )
4 September 2017