Reply – अधुरी एक कहाणी..
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
अधुरी एक कहाणी..
— by navin navin
काल अचानक खूप दिवसांनी तिने message केला, सर कसे आहात म्हणून. तिचा message पाहून त्याला खूप छान वाटले पण तरीही सर बोललेले त्याला कधीच नाही आवडायचे आणि त्यातल्या त्यात खूप दिवसानंतर तिने message केला म्हणून तो खूप चिडला बोलला तुला काही काळजी नाही माझी, काही गरज नाही मला message करायची असे खूप बोलला, ती बिचारी सगळे ऐकून good night बोलली आणि झोपी गेली पण त्याला काही केल्या झोप येईना. तिला नाही नाही ते बोललो म्हणून त्याचे त्यालाच वाईट वाटले. त्याचे नेहमी असेच होते काही विचार न करता मनात जे येते ते सगळे बोलून टाकायचे मग नंतर स्वतःच त्यावर विचार करत रात्र रात्र जागी राहायचे. त्याचा स्वभाव तसाच होता, कितीही टेन्शन असले तरी चेहऱ्यावर ते कधीच दाखवणार नाही नेहमी हसरा स्वभाव, स्पष्टवक्तेपणा. त्यामानाने ती शांत, थोडीशी खोडकर पण तितकीच प्रेमळ. नेहमी स्वतःपेक्षा दुसर्यांचा जास्त विचार करणारी.
ते दोघे एकाच कंपनी मध्ये काम करायचे. तो दुसऱ्या कंपनी चा होता म्हणून सगळे त्याला सर म्हणायचे. त्यादिवशी पहिल्यांदा त्याने तिला पाहिले, पाहताच क्षणी त्याला ती आवडली. तो दररोज तिला पाहायचा पण तिच्या जवळ जाऊन बोलण्याची त्याची हिम्मत झाली नाही. एक दिवस ती ऑफिस ला आली नाही म्हणून त्याने रघु काकाना तिच्याबद्दल विचारले, त्यांनी विचारले कि तुम्ही का तिच्याबद्दल विचारले तर तो म्हणाला ती खूप छान हसते पण त्याला हे माहित नव्हते कि हीच गोष्ट दुसऱ्या दिवशी रघु काका तिला सांगणार आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती आली तेव्हा रघु काका तिला बोलले कि ते साहेब तुला मिस करत होते त्यावर ती म्हणाली, चांगले आहे ना कुणाला तरी आमची आठवन येते. तो तिला पाहून किंचित हसला आणि ती पण हसली. शेवटी त्याने धीर करून तिला स्वतःबद्दल सांगितले, त्यानंतर प्रत्येक दिवशी तो तिच्याशी बोलायचा.
दररोज जेवायला बसल्यावर ती नेहमी त्याला जेवायला बोलवायची तसे त्याला पण वाटायचे कि तिने त्याला जेवायला बोलवावे पण ऑफिस मध्ये उगाच गॉसिप नको म्हणून तो नेहमी तिला जेव बोलायचा आणि स्वतः जेवायला निघून जायचा. त्याला मेथीची भाजी खूप आवडायची हे तिला माहित होते म्हणून एक दिवस तिने मेथीची भाजी आणली आणि हट्टाने त्याला जेवायला घातले. जेवायला ती खूप वेळ लावायची आणि व्यवस्थित नाही जेवायची म्हणून तो दररोज तिला रागवायचा. एक दिवस तिने संक्रांतीला लाडू आणले होते आणि ऑफिस मध्ये सगळ्यांना वाटले आणि त्याला तिने दोन लाडू दिले तर त्याचे मित्र सगळे त्याला तिच्यावरून चिडवत होते, त्या दिवशी ती इतकी गोड लाजली कि तो एकटक तिला पाहत होता. पाणीपुरी आणि डाळभात ह्या दोन गोष्टी तिला खूप आवडत. तो तिला भेटण्यासाठी लवकर उठून ब्रश करून कॅन्टीन मध्ये तिची वाट पाहायचा. तिला चहा नाही आवडायचा पण त्याच्यासोबत ती थोडा का होईना चहा घेत. चहा घेता घेता तो एकटक तिलाच पाहत राहिला कि ती लाजून मान खाली घाले, त्याला ते सहन नाही व्हायचे म्हणून तो तिला विचारे कि मी असे बघितले तर त्रास होतो का तुला. ती लाजून नाही म्हणे. मग ते दोघे ऑफिस पर्यंत सोबत जायचे, त्याला वाटायचे कि हा प्रवास कधीच संपू नये. तिला ऑफिस पर्यंत सोडून परत येताना त्याला खूप वाईट वाटायचे. त्याला तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेम दिसत होते पण कधी त्याने ते स्पष्ट बोलून दाखवले नाही तिनेहि तसे काही बोलवून नाही दाखवले.
त्याला थोड्याच दिवसात दुसऱ्या कंपनी मध्ये जायचे होते त्यावरून तो खूप निराश होता खरेतर त्याला जायचे होते पण त्याची जुनी कंपनी त्याला लवकर सोडत नव्हती त्यामुळे त्याचे दररोज कंपनी च्या लोकांशी बोलणे व्हायचे. त्यादिवशी तो खूप काळजी मध्ये दिसत होता तिला त्याचे टेन्शन समजत होते. ती त्याच्या जवळ आली आणि त्याचा हात तिने घट्ट पकडला आणि त्याला बोलली नको काळजी करू तुला जसे वाटते तसेच होईन. तिच्या तसे बोलण्याने त्याला खूप बरे वाटले, ती तसे वागेन असे त्याला अपेक्षित नव्हते. म्हणता म्हणता त्याचा जायचा दिवस जवळ आला, त्या दिवशी त्याच्या ऑफिस मध्ये सगळ्यांनी त्याला निरोप दिला आणि गिफ्ट पण दिले. ती त्याचा निरोप पाहून भावुक झाली होती पण ती त्याला काही नाही बोलली, त्याला तिची अवस्था समजत होती खरेतर त्याची पण तीच अवस्था होती. जाण्याआधी तिला बस स्टॅन्ड पर्यंत सोडावे म्हणून तो तिच्यासोबत निघाला, स्टॅन्ड ला आल्यावर ते दोघे पण शांत होते कुणीच कुणाशी काहीच बोलत नव्हते खरेतर काय बोलावे हे कुणाला सुचत नव्हते शेवटी तीच म्हणाली चल पाणीपुरी खाऊ, तो हो म्हणाला आणि मग एकाच प्लेट मध्ये दोघांनी पाणी पुरी खाल्ली. पाणी पुरी खाताना दोघांचे एकमेकांकडे लक्ष होते फक्त कोण काही बोलत नव्हते. तो आधीच तिला बोलला होता कि मला तू हसत हसत निरोप द्यायचा त्याप्रेमाने ती तशीच वागत होती. शेवटी तिला असह्य झाले तिने त्याला जायला सांगितले, बोलली तू जा माझी बस येईल मी जाईन तुझे मित्र वाट बघत असतील. ऑफिस मधील काही लोक त्याला भेटायला येणार होते म्हणून तो पण नाईलाजाने तिला निरोप देऊन जड पावलांनी निघून गेला. ती खूप वेळ तशीच तिथे एकटी बसून होती, तिच्या दोन बस येऊन निघून गेल्या पण तिचे कशातच लक्ष नव्हते शेवटी तिच्याच गावातील एकीने हाक दिली आणि ती त्यांच्यासोबत बस मध्ये बसली. त्याची अवस्था तिच्यासारखीच होती, कसे बसे त्याने आवरले आणि तो निघाला. तो ट्रेन मध्ये बसला आणि त्याची अवस्था अजून वाईट झाली राहून राहून त्याला वाटायला लागले कि ट्रेन मधून उडी टाकावी आणि परत तिच्याकडे जावे पण फक्त एकट्याचा विचार करणे त्याला कधीच जमले नाही आणि कधी जमणार पण नव्हते. दुसऱ्या दिवशी व्हॅलेंटाईन्स डे होता म्हणून त्याने तिला 'will you be my valentine' म्हणून message केला आणि तिचा हो म्हणून रिप्लाय आला पण त्याला खूप वेळ झाली होती, ते परत कधी भेटणार कि नाही हे त्याला आणि तिला पण माहित नव्हते..कदाचित ते एकमेकांना भेटतील हि..

By..
Navin.