Reply – कबुली
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कबुली
— by Akash Khandke Akash Khandke
मला चांगल आठवत सगळं.पण तुला आठवत का ग काही.'काही' म्हणलो कारण तुला सगळं आठवत नसणार याची मला खात्री आहे.कारण ते विश्व खरंतर तुझं होत आणि मी त्याचा एक छोटासा भाग असण्यापलिकडे काहीही नव्हतो.तुझ्याबरोबर आणि तुझ्या आसपास घालवलेले कितीतरी क्षण आठवणीच्या फ्रेम मध्ये सजवून ठेवलेत मी.पण ती फ्रेम तुला नाही दाखवू शकलो मी कधी.साध्या सोप्प्या भाषेत बोलायचं तर तू माझ्या साठी काय आहेस हे मी कधी तुला काय स्वतःला पण नाही समजावू शकलो.फिरवून बोलायची सवय लागली आहे ग.लेखक आहे ना मी.कदाचित तुला हे ही माहित नसेल.कस असणार?ना तू स्वतःहून कधी बोलणार.ना मला बोलायला जमणार.पण तुला आज खर सांगतो.अगदी खरं.मनात साठवून ठेवलेलं एक गोड सत्य.मला आवडलेली तू पहिली मुलगी.बहुदा माझं पहिलं प्रेम.

पण आता हे विचारू नको कि पहिली आणि शेवटची का?

याच उत्तर नाही माझ्याकडे....