Reply – बाबा
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
बाबा
— by harshada harshada
तू मागितले नाही कधीच ,
अन माझे द्यायचे राहून गेले...
बाबा तुझ्या प्रेमाचे ओझे फेडायचे राहून गेले..
तुझ्या शिस्तीआडचा बाबा भेटलाच नाही कधी,
वेळ निघुन गेली आता भेटायचे राहून गेले...
आईच्या पदराची ऊबच इतकी गहीरी होती,
तुझ्या रागातले प्रेम पहायचे राहून गेले...
रात्री तुही जागल्यास डोक्यावर ठेवत पटटी,
माझे बालपण तुझ्या वाटणीचे जगायचे राहून गेले ...

Harshu
Harshada