Reply – लग्न कि करियर
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
लग्न कि करियर
— by navin navin
लग्न कि करियर
 असे म्हणतात कि लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात पण माझ्या मनात एक प्रश्न नेहमी पडतो कि मुलींनी लग्नाला महत्व द्यावे कि करियर ला.. अर्थात लग्न हि गोष्ट आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे पण तितकेच महत्वाचे करियर पण आहे.. काही ठिकाणी तर मी असे पण बघितले आहे कि मुलगी १६ वर्षाची झाली नाही कि लगेच तिचे आई वडील तिच्या लग्नाचा विचार करतात आणि काही पुढचा मागचा विचार न करता तिचे लग्न लावून टाकतात, अर्थात हळू हळू हि परिस्तिथी बदलत चालली आहे तरी पण मुलींच्या लग्नाच्या बाबतीत आई वडील जरा जास्तच विचार करतात त्यांच्या दृष्टीने हे बरोबर हि असेल.
माझी एक वर्ग मैत्रीण होती, शिकायला खूप हुशार दरवेळी क्लास मध्ये तिचा पहिला नंबर यायचा खरेतर मी तिच्यावर जळायचो पण ती खूप कष्टाळू होती. दहावि ला तिला खूप चांगले गूण मिळाले त्यानंतर तिने science ला ऍडमिशन घेतले आणि काम करत करत ती आपले शिक्षण पूर्ण करत होती आणि अशातच तिचे लग्न ठरले, तिच्या नशिबाने तिला चांगला नवरा भेटला ज्यामुळे घर सांभाळून मोठ्या जिद्दीने तिने प्रथम श्रेणी मध्ये बी.sc पूर्ण केली पण त्यानंतर तिच्या परिवारामुळे तिला काहीच करता आले नाही, जर तिला एक चान्स मिळाला असता तर तिने खूप काही साध्य केले असते पण तसे काही झाले नाही. माझी अजून एक मैत्रीण जीची ओळख नागपूर च्या पेपर मिल मध्ये असताना झाली, ती तिथे अँप्रेन्टिस म्हणून जॉईन झाली होती. इंजिनीरिंग करून तिला वर्ष पूर्ण झाले होते खरेतर तिला हैदराबाद किंवा पुण्याला जाऊन आयटी मध्ये काम करायचे होते पण जर ती घरापासून लांब गेली आणि तिच्यासाठी एखादे स्थळ आले तर तिला येता येणार नाही ह्या एका विचाराने तिच्या घरच्यांनी तिला नागपूर बाहेर कधीच जाऊ नाही दिले. आता तिने अँप्रेन्टिस पूर्ण केली आहे आणि जवळ जवळ सहा महिने झाले घरात बसून आहे, जेव्हा पण ती कामासाठी बाहेर जायचे घरच्यांना विचारते तेव्हा तिच्या घरचे तिला काही ना काही कारण देतात. तिचे लग्न करायचे हि खरेच खूप मोठी जबाबदारी आहे पण फक्त मुलीच्या लग्नाचा विचार करणे योग्य आहे का.
जर तिला तिचे स्वतःचे असे काही अस्तित्व बनवायचे असेल तर त्याचा तिला हक्क नक्कीच आहे, आता काही वडील मंडळी हे पण म्हणतात कि पाहिजे तर तिने लग्न झाल्यावर काय करायचे ते करू शकते पण खरेच लग्न झाल्यावर घरच्या जबाबदारी सांभाळून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करणे सोपे आहे का. लग्न झाले कि फक्त नवराच नाही तर तिला तिच्या घरच्या सगळ्यांची मने राखावी लागते, कुणाला काय हवे काय नको हे सर्व नीट बघावे लागते. कुणी रुसले कि त्यांना लाडीगोडी लावा, वेळ आलीच तर घरच्यांची बोलणी ऐकून घ्या आणि हे सर्व करताना तिला काय वाटते ह्याचा फार कमी लोक विचार करतात. सावित्रीबाई फुलेंनी लग्नानंतर स्त्रीशिक्षणाचा पाया रचला पण त्यास महात्मा फुले यांचा खूप हातभार लागला, सध्याच्या युगात असे किती महात्मा फुले आपल्याला पाहायला मिळतील. मी असे म्हणत नाही कि मुलींच्या लग्नाचा विचार करू नये तर तो नक्कीच करावा पण ते करताना आपल्या मुलीच्या स्वतःच्या अशा काय भावना आहेत ते जाणून घेणे खूप चांगले.
by... navin.