Reply – कविता - रात्र
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता - रात्र
— by Swapnil kelkar Swapnil kelkar
रात्र त्या दिवसभराच्या थकव्यानंतरच्या विश्रांतीची आणि मंदपणे वाहणार्या गार  वाराची....

रात्र त्या शांत असलेल्या निसर्गाची आणि मोहक असा सूगंध पसरवणार्या त्या रात्री फूलणार्या रातराणीची....

रात्र त्या किरकिर करणार्या रातकिड्याची आणि मनाला स्पर्श करणार्या त्या वार्यातील गारव्याची ....

रात्र तिच्याशी बोलण्यासाठी जागण्याची आणि तिच्यासोबतच्या आठवणी नव्याने आठवण्याची....

रात्र तीचा मी आणि ती फ़क्त माझीच असणार्या स्वप्नांची आणि ही स्वप्न सत्यात उतरावीत असं वाटण्याची....

ही रात्र  त्या आकाशातल्या चंद्रा सोबत लुकलुकणार्या तार्यांची...
ही रात्र तिच्या माझ्या अबोल आणि अव्यक्त अश्या प्रेमाची.....

                         :स्वप्नील केळकर