Reply – अनुभव
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
अनुभव
— by विजया केळकर विजया केळकर
         अनुभव

     नळाच्या रांगेत घागर धरून,झिंज्या पिंजारून
     उभी एक पोर गुडघ्यावरचा स्कर्ट वर करून
    सरकली पुढे इतर घागरी मागे सारून, वाकून
    विमानाचे लॉकेट, विमानतळावर आणून ||

    टपडीवरची पानपट्टी हातात धरून
    टवाळ पोरं बघत राहिली तोंड वासून
    तशी मुद्दाम आळस देते हात वर करून
   लाळघोट्यांची बाभळीची काडी गळली तोंडातून ||

   बाप्याने अस्तन्या वर करून मांडी ठोकली
   बायल्याने ' आग, बया बया ' हाक दिली
   चौकटी लुंगी, चौकटी बुशशर्ट फिदी फिदी हसले
   चौकस  'ती ' जागची मुळीच नाही हलली ||

  एक नवी मिसरूड डोळा फाडून
      बादली पुढे करू लागली
  नवी ' जान ' मागे सरकू लागली

  निबर जुनी झाली होती जबर, क्रूर,सावध
  तिनं कवळी कळीनेली दूर,
          होऊ न देता पारध ........... ||

            विजया केळकर ____
\