Reply – कविता ॥ काय मग आतातरी वाटतेय का लाज ?॥
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता ॥ काय मग आतातरी वाटतेय का लाज ?॥
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar

काय मग आतातरी वाटतेय का लाज ?

बळीराजा पेटून उठलाय आज

इतके वर्ष आपल्यावर होती ज्याची सावली

तीच माउली या हराम्यांमुळे आपल्यावर हाय कावली

कॉम्पुटरचे किडे तोंडात मूग गिळून बसलेत

नेतेमंडळी कित्येक वर्ष चर्चाच करून थकलेत

पोरांना फाळावाणी झाडावर लटकलेलं बघून

शेतकरी आता मात्र पेटून उठलेत

अच्छे दिन अच्छे दिन म्हणून

बहू केली मनातली बात

आता दावतायत चांगला इंगा तुम्हाला

पिकलेलं फेकून कचऱ्यात

आमची मेहनत

मजा तुमची

चालू युगे युगे

मिट्ट अंधारी लोटल्या पिढ्या

दाखवून स्वप्नांचे फुगे

आठ तास काम करुनि  

गाडी घेऊन फिरतो

चूल मूल आमच्या पाठीवरती

दिनरात आम्ही नांगरतो

ना कसला राविवार माहिती

नसते कसली सुट्टी

गांड फाटेस्तोवर काम करूनही

दोन घासाची भ्रांती  

ठिणगी पडलीय बरीच आधी

ज्वाला बाहेर येतोय

सावध हो सरकारा नाहीतर

दिसेल दुसरी रक्तक्रान्तिसिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास