Reply – कविता ॥ ओशाळला मृत्यू इथेही ॥
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता ॥ ओशाळला मृत्यू इथेही ॥
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar


तिचा माठ खालीच होता

माटाचा काठ शुष्क होता

जमीन सारी भेगाळलेली

नजर थेम्ब थेम्ब पाण्यासाठी आसुसलेली

हुंदके जणू कोरडे नाले

रक्त आटुनी शरीर तप्त झाले

ओशाळला मृत्यू इथेही

त्यालादेखील मरण प्रिय झाले

स्वगत मृत्यूचे..........

जीव घेऊ तो घेऊ , पण घेऊ कुणाचा ?

आत्मा कधीच गेला निघून ,

संघर्ष अविरत जीवनाचा

जन्मपाशात जो तो अडकला इहलोकी

मी सुखी मानतो स्वतहाला , यमलोकी

ठिगळ लागलेलं कापड

ती पाण्याची धडपड

अन्नाची तडफड

श्वास कोंडला रे माझा

मी मृत्यू जरी असलो

जरी असलो मी काळ

बघवत नाही मलापण , ते रडणारं बाळसिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास