Reply – त्याच आंधळं स्वप्न....!!!
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
त्याच आंधळं स्वप्न....!!!
— by dipak bhutekar dipak bhutekar
  सकाळी रोजच्या प्रमाणे तिने खिडकीच्या पडदा सरकवला आणि सूर्याची किरण ठेट डोळ्यावरच आली आणि साखर झोपेच खोबर झाल.! हात-पाय लांबुन आळस देत जोरात सुर दिला "good morning mom" आणि ती डोक्यावर हात फिरून "उठ आता" आस म्हणत निघून गेली परत डोळे घट्ट बद्द करणार तितक्यात i-च्या फोन ची बेल कडमडली मूड नसताना फोन घेतला अन आवाज ऐकुन लक्षात आल काल 'हिला' मूवी ला नेण्याच प्रॉमिस केल होत, खाड दिशी उठून बोललो "yes janu, wait आलोच"....
       डायरेक्ट फ्रेश व्हायला निघालो 10 वाजले तरी मंद गोड थंडी जाणवत होती. लवकर-लवकर शावर घेतलं आणि तयारी सुरु केली कारण impression कमी पडायला नको.मस्त Leatherच jacket, Rolexची watch, iचाPhone, Reebokचे shoes, imported Gogle सगळी तयारी सुरु केली आईला चार वेळा आवाज देऊन handkerchief, wallet सारख्या वस्तु बोबलून-बोबलून मागवून घेतल्या  and finally  परफ्यूम मारून hero ready झाला....
    बेडरूम बाहेर येताच बाबाच दर्शन झालं त्यांना " hey good morning dad" म्हणून मॉडर्न दंडवत केला. आणि परत एकदा i-चा फोन केकाळायला लागला फटकन खिशातून बाहेर काढून "yes dear on the way  आहे आलोच" म्हणून कट केला, समोर मातोश्री ब्रेकफास्ट घेऊन उभ्या होत्या तोंड वाकड करून ब्रेड चे दोन बाईट तोडले आणि mom च्या गालावर kiss देऊन चार चाकीची चावी घेऊन  "bye mom संध्याकाळ पर्यंत येतो, फ्रेंड्स कडे जातोय स्टडी साठी" आणि स्वारी निघाली आई बिचारी दरवाज्यात येऊन ओरडली "बाळा लवकर ये काळजी घे आणि काही तरी खाऊन घे" म्हणत 'बाय' करत हात हलवला....
     गाडी स्वच्छ पुसुन तयार होती पण आत मात्र सगळा पसारा कॉलेज ची बॅग चॉकलेटचे रॅपर, फाटक दिशी सर्व आवरून जॅकेट चा gogel डोळ्याला लावला आणि चावी लावून फिरवली आणि, अचानक जोरात रेल्वे च्या इंजिन चा आवाज आला, अलौसमेंट होत होत्या, प्रवाश्याची वरदल सुरु झाली होती सगळा गोगाट आईकायला येत होता...आणि हाडब्डून जाग आली...
       दिवस उजाडला होता सूर्य ची मंद ऊब जाणवत होती प्लॅटफॉर्म मात्र थंड पडला होता. जाग आली होती पण अंधार मात्र कायम होता, का नसावा तोच तर एक खरा सोबती होता जन्माला आल्या पासुन तोच तर होता ज्याने कधी एकट नाही सोडल आणि असाच मरे पर्यत सोबत राहणार होता."या नाव्हाच्या दुकानात बसून ऐकलेल्या सिनेमाच्या कथे मुळे कसली विनोदी स्वप्न पडतात" आसा विचार करत गालावर स्मित हास्य आणुन फाटकी वाकळ सावरून पिशवीत कोबली शेजारी पडलेली काठी एका हाताने उचलली समानाची पिशवी दुसऱ्या हाताने पाठीवर ठेऊन स्टेशनच 'सार्वजनिक शौचालय' गाठल तिथेच आंघोळ करून तिथेच आपलं गाठोडं ठेऊन स्वारी निघाली कामाला...
     
         आंधळा असला तरी पायांना प्रत्तेक रस्ता, स्टेशन काना-कोपरा माहित होता हातांना प्रत्तेक नोटांची आणि नाण्याची जाण होती येणाऱ्या ट्रेनच नाव आणि वेळ तोंडी पाठ होते. अनाथ व अंध आश्रम सोडल्या पासून गेली दहा वर्षे तो हेच तर करत होता. फाटके पण स्वच्छ कपडे,फाटके बूट मोजे तर नव्हतेच, मी आंधळा आहे आस ओरडून सांगणारा काळा चष्मा, एका हातात अंधछडी, आणि दुसऱ्या हातात तीन-चार पुस्तक, गळ्यात आडकऊन कमरे वर लटकवलेली पुस्तकांनी भरलेली बैग, नाही बैग नाही थैलीच होती ती..!
    रोज आपलं हे सगळं सामान घेउन रेल्वे-रेल्वे मधून पुस्तक विकायची हि ठरलेली दिनचर्या. पुस्तकच विकायची कारण कि त्याला पुस्तकाची भारी आवड कधी पाहिली किंवा वाचली नव्हती पण ती वाचून आयुष्य घडत आस त्याने ऐकलं होतं म्हणून जणु त्याने वसाच घेतला होता त्याच ठरलेलं होत, किंमत दिसत नाही म्हणून एकाच किमतीची पुस्तक विकायला घ्यायचा, पण 'विकायची तर पुस्तकाचं' मिळणाऱ्या मिळकती वर 2 वेळ जेवण करायचं परत थोड्या पैशाची पुस्तक विकत घ्यायची आणि बाकी उरलेली सर्व पुंजी एका डब्यात जमा करायचा. आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो डबा त्याच आंनाथ आणि आंध मुलानंच्या आश्रमात जायचा ज्यां आश्रमात त्याचा सांभाळलं होता....
      फार काही आपेक्षा नव्हत्या त्याच्या बस आयुष्यात भीक मागायची नाही हे ठरलेलं होत, येणाऱ्या अडचणीला तोंड द्यायचं बस..!  स्टेशन वर लोक चेष्टा कराचे टिंगल उडवायचे, गाडीत लोक शिव्या घालायचे कधी चुकून कमी-जास्त धक्का लागला तर हात देखील उचलायचे पण त्याच्या वाटेला आलेल्या दारिद्रा समोर ह्या सर्व गोष्टी त्याला छोट्या वाटायच्या.
        दिवस भर काम करून रात्री परत आपली खूप सारी स्वप्न घेऊन आधाराने दाटलेल्या डोळ्याच्या पापण्या बंद करून स्वतःला आणखीन आंधारात ढकलून द्यायच. आणि विचार करायचा "माझं देखील कुटुंब असत तर.." "कुणी प्रमाणे हाक द्यावी.." "माझी पण किणी रोज संध्याकाळी वाट पाहावी" ठीक आहे हे सर्व नाही तर किमान "हे जग मला निधड्या डोळ्याने आनऊभवता आलं असत तर बघता आलं असत तर बघता आलं असत तर बगत आलं असत तर"....आसा विचात करत उद्याच्या प्रवासासाठी नव्या स्वप्नान मध्ये हरवून जायचा...!


--#Dipak...!
"ते आसाच विचार करत असतील.! नाही का?"....