Reply – ॥ तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या ॥
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
॥ तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या ॥
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar

तप्त झाली धारा सारी

दहाही दिशा त्या पेटल्या

दिनकराशी हात मिळवुनी

उग्र होऊनि परतल्या ॥

मरूत व्यस्त, घाले गस्त

थैमान चहूकडे माजले

पशु, प्राणी, झाडे पक्षी

नद्या नाले भाजले ॥

रुक्ष झाले वृक्ष सारे

सावलीपण महाग ती

यत्र तत्र वणवा पेटला  

स्वस्त झाली आग ती ॥

कोपला तो, झोपला तो

भक्ती कमी जाहली

मोह मायेत प्राण सारे

म्हणुनी झाली काहिली ॥


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास