Reply – कविता ॥ काय लिहू मी माझ्यावरती , अशी ओवाळली तू माझी आरती ॥
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता ॥ काय लिहू मी माझ्यावरती , अशी ओवाळली तू माझी आरती ॥
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar


काय लिहू मी माझ्यावरती

अशी ओवाळली तू माझी आरती

कि दत्त दिगंबर धावुनी आले

तुझा बाप होता माझ्या च्छाताडावरती ॥

कसा बसा मी तिथून बचावलो

नशीब बलवत्तर म्हणून निभावलो ॥

तू तेथुनि अशी सटकलीस

बघता बघता आईला बिलंगलीस

माझे झाले डोळे पांढरे

बाप बुकलतो समजुनी मेंढरे ॥

स्त्री माता हे मान्य हो मजला

मला साल्यानो काय समजला

मी नसे हो कुणी येड्यागबाळा

उच्च्कुलीन मी अन रंग सावळा ॥

का उगा तुम्ही हात उगारला

सांगा असा काय अपराध मी केला ?

पोरी पडल्यात साठ नि सत्तर

तुमच्या पोरीचे नशीब बलवत्तर

म्हणून सहन मी मार पण केला

नाहीतर दिले असते तेव्हाच उत्तर ॥

ठेवा तुम्ही तिला पंखाखाली

चालू द्या अशीच रखवाली

या बापड्याचे श्राप लागतील

जावई मिळेल अट्टल मवाली ॥


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास