एक पिंपळपान जाळीवाले,
आठवणींच्या देशी घेवुन गेले
अंगणातला प्राजक्तीचा सडा
आणि चिरेबंदी वाडा...
वाडयातल्या आजीचा उबदार हात,
अन् रात्री निजताना पर्यांतची साथ,
तुळशीसमोर तेवणारी एक मंद पणती,
देव्हार्यातत गुंजणारे आपले शुभंकरोती,
आमराईतल्या आंब्यांची झोडलेली मेजवानी,
सार्यांबनी डोंगर चढताना गायलेली गोड गाणी,
हुडहुडणार्यां थंड पहाटे पेटवलेली शेकोटी,
अंधुकश्या प्रकाशात रंगणार्याह भुतांच्या गोष्टी,
एकमेकांसोबत घालवलेले दिवस वार्यासारखे होते,
आजही त्या आठवणींनी मन ओलेचिंब होते,
आजी गेली, आई गेली, बाबाही खंगुन गेले,
वाडाही आताशी थकला आहे...
फक्त एका वेडया आशेवर अजुन पावेतो टिकला आहे...
अजुनही त्याला भरलेलं घर हवयं
मनपासुन प्रेम करणारं एक तरी मनं हवयं,
अंगणात ती मायेची रंगोळी अन् कौलारु त्याचा शिरपेच शाकारणारा बाबांचा तो हात हवायं....