Reply – कविता II सकाळी चहाच्या वेळेला , जर समोर खंबा असेल II
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता II सकाळी चहाच्या वेळेला , जर समोर खंबा असेल II
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar

जेव्हा तुम्हाला सगळं जग

गुलाबी दिसू लागेल

सकाळी चहाच्या वेळेला

जर समोर खंबा असेल

सोबत पाहिजे तो चकणा असेल

बाहेर मस्त पाऊस आणि गारेगार वारा सुटला असेल

कसलंच टेन्शन नसेल

तर लगेच उठा , सावध व्हा त्याचवेळी

हातात एक सेफ्टी पिन घ्या

आणि टोचून बघा

भानावर याल....

किंवा नक्कीच स्वप्न बघत असाल ...


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास