Reply – कविता II कुणी बांधला " बांध " हा जातीपातीचा II
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता II कुणी बांधला " बांध " हा जातीपातीचा II
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar


कुणी बांधला " बांध " हा जातीपातीचा

रंग कधी बदललाय का त्या लाल रक्ताचा ?

मला मान्य , झाले असतील पूर्वी अत्याचार

आजचं काय ? का माजलाय आरक्षणावरून भ्रष्टाचार ?

नेते चेकाळले बहू , ढोंग सारे, जणू करी रयत रक्षण

इथे जो तो सैराटला, मागत सुटे आरक्षण

दुर्लभ ते मुख शेजाऱ्याचे , दुर्लभ समाजऐक्य दर्शन

धर्मभावना दुखावता जरा , करी एकमेका भक्षण

इथे ना समजे परमार्थ कुणाला , ना जातीचा अर्थ

तरी त्यावरी वाद चाले , वेळ वाया व्यर्थ

का आलो जन्मास मानवा , यावर नसे कधी चर्चा

काय उपटले इथवर येऊनि , का फक्त गरम केल्या खुर्च्या ?

पात्र अपात्र आरक्षण ठरवे, पदास नसे त्या मान

जन्म घेऊनि काय लाभले  , बळी दिला स्वाभिमान  


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास