Reply – कविता-बाटली
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता-बाटली
— by Rahul vedpathak Rahul vedpathak
🍾🍾  बाटली 🍾🍾


साधी, ठेस लागली तर
तोंडातून फुटे आई..

मग, मुकया जीवाचा वध करून
बकऱ्याचं मांस कोण खाई..

अहो, मनुष्य त्याच नांव
त्याला, आहे की हो, गांव..

बकरी सोलून खाणारा
टोपण काढून पिणारा..

तो असतो आपलाच भाऊ
त्याची बायको, माझ्या बायकोची जाऊ...

मी जाऊन सागितलं तिला
तुझा नवरा रात्री दारू पिला..

ती हसत हसत, म्हणाली
माझ्या नवऱ्याची सवय तुम्हाला आता कळाली...

अहो, मला रोजच येतो व्हीस्कीचा वास
अहो, भावजी त्याची चव लयचं खास...

मी म्हणालो, अहो वहीनी तुम्हीपण
ती म्हणाली, आदि ते, आता आम्ही दोघेपण...

वहिनींचे, ऐकून माझं चित्त उडालं
माझं बी मन बाटलीकडं पळालं

माझ्या ओठानं बाटलीला शिवलं
माझ्या हिंतचिंतकानोे, मी आज थोड मजेशीर लिवलं.....


😁😀😁😀😁😀😁😀😀
     
        - राहूल वेदपाठक

✍✍✍✍✍✍✍✍✍