Reply – तु एकदा येवून जा..
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
तु एकदा येवून जा..
— by Rahul vedpathak Rahul vedpathak
📜📜📜📜📜📜📜📜📜तुला लिहताना...तु एकदा येवून जा..


तुझ्यासाठी समुद्र उधाणलाय..
वारा पिसाटलाय..
वारा ईकडून-तिकडे वेडया सारखा भिरभिरतोय..
ना हाताला लागतोय..
ना वटणीवर येतोय..
उधाणलेल्या लाटा
किनाऱ्यावर आदळून खडकांना जखमा झाल्यात..
झालेल्या जखमा मीठाच्या पाण्यान भडभडत्यात..
तरी किनाऱ्याची वाळू मूक गिळून बसली..
झाडं, वेली, फुलं वाऱ्यासमोर अंग मोडून बसली..
स्वहित जळणारा सुर्य रक्ता- बंबाळ झालाय..
निरागस आभाळ कोंदटलय..
हे पाहायला..
तु एकदा येवून जा..
तु एकदा येवून जा..

बघ बघ तुझ्या येण्यांन..
समुद्र शांत होईल..
वारा ताळ्यावर येईल..
झालेल्या मर्म जखमा क्षणात ओसरतील..
समुद्र वाळू पुन्हा पोटात घेईल..
झाडं, वेली,फुलं नवचैतन्य पेतील..
सुर्य पुन्हा स्वहित जळेल..
तेव्हा तुला कळेल..
आकाश देखील फुलेल..
ते पाहायला
तु एकदा येवून जा..
तु एकदा येवून जा..

जाता जाता मला ही पाहून जा..
माझ्याही हृदयात..
प्रेमाचा सागर हायडोजन सारखा फसफसतोय..
कधी गालात हसतोय तर..
कधी धुुसमुसतोय..
माझ्या प्रेमाची लाट..
एक निशांत वाट शोधतेय..
तिथे नाही..
समुद्र,वारा,खडक,जखमा..
तिथे नाही..
वाळू,झाडं,वेली,फुले, आभाळ..
तिथे कोणीच नाही
नाही सकाळ,नाही संध्याकाळ
हे पाहायला..
तु एकदा येवून जा..
तु एकदा येवून जा..

मी नाही परत येणार..
मी नाही परत पाहणार..
तेवढयात तुला कुणाचातरी फोन येणार..
तु त्याच्याकडं जाणार..
तु तुझ्या डोळ्यान पाहणार
तिथलीे भयानक शांतता..
लोकांची अफाट गर्दी
तिथे असंख्य दर्दी
माझ्याकडे पाहत असणार..
कुणी माझ्या कडे पाहून डोळे पुसत असणार..
तर कोणी माझ्या कवितेने झालेल्या जखमा पोसत असणार..
तेवढयात तु मला दिसणार..
खांबाला टांगलेल्या स्पीकर मधून कानावर आवाज येणार...
हे पाहायला
तु एकदा येवून जा..
तु एकदा येवून जा..

मग,प्रेक्षक जागे होणार..
लाखोंच्या संख्येने टाळ्या कडकडणार..
ते पाहून तु असंख्य प्रेक्षकांतून वाट काढत धावत माझ्याकडे येणार..
मला कवटाळून मिठीत घेणार..
मी तुझ्याकडे पाहणार..
तु माझ्याकडे पाहणार..
तेवढयात प्रेक्षकांच्या मुखातून आवाज येणार..
हे पाहायला..
तु एकदा येवून जा..
तु एकदा येवून जा..

 -राहूल वेदपाठक

📃📃📃📃📃📃📃📃📃