Reply – ** परिस्तिथी आणि ती**
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
** परिस्तिथी आणि ती**
— by Ankita patil Ankita patil
त्याचे म्हणणे "काही नसतं आपल्या हातात परिस्थिती असते छळत मन हि जाते मरुन मग अश्रूसुद्धा नाही गळत.."
ती म्हणते "अश्रू आणि दुःख तर असतात पण ह्यालाच तर आयुष्य म्हणतात खरं तर मन मेले असते तर इतकं सुंदर तू बोलूच शकला नसतास..."
तो काहीच बोलत नाही...
तीच पुढे म्हणते " तू जे दुःख बोलतोस त्याला सुख समजून फक्त face कर , कर नाही आपण करूया...! "
 पुढे उदभवणाऱ्या गोष्टीचा विचार करणं उत्तमच आहे पण म्हणून कुणी जगण सोडून देत का..!...उलट त्या गोष्टीला मात करत , झगडून परिस्तिथीशी दोन हात केले पाहिजे...त्यात जर कुणाची सोबत असली तर अजूनच बळ मिळते...
तो फक्त ऐकतो काही बोलत नाही...
त्या दिवसानंतर तो बोलणं कमी करतो तिला टाळतो,
ती खूप प्रयत्न करते पण तो काहीच बोलत नाही त्या विषयावर जस त्याच्यासाठी त्या दिवसानंतर सगळ संपलं होत, अगदी त्याच्या त्या ओळीप्रमाणे , जस काय त्याच मनच मेल असावं...
( तो फक्त noraml बोलतो पण त्याचा त्रास तिला खूप होत असतो, सहाजिकच आहे कुणी इतकं जवळच असं वागणं खूप दुखावत आपल्या मनाला.)
तिचे प्रयत्न ती चालूच ठेवते पण शेवटी उत्तर मात्र शून्यच मिळत असत तिला,

-- नातं दोन माणसंच असत पण त्यातला एक ते सहजच तोडून निघून कसा जाऊ शकतो , हा प्रश तिला येतो.
ती म्हणते ठिके प्रत्येकच आपलं आयुष्य असत त्याचा निर्णय आपण स्वतःच घेणं योग्य पण आहे..., मग मला फक्त तुझ्या या असं वागण्याचं कारण तरी मला समजेल का..?
तिचा हा sms पाहून हि तो काहीच बोलत नाही किंवा उत्तर पण कळवत नाही..--
ती अजून पण प्रतिक्षेत असते....

***प्रेम असेल तर पुढे येणाऱ्या गोष्टींवर मात करण्याची क्षमता देखील असावी नाहीतर ते न केलेलेच उत्तम.
उगीच एखाद्याला आपल्यात गुंतून काही न बोलता सगळं थांबवन हे चुक्कीचे आहे..***

अंकिता पाटील,
 मुंबई.