Reply – "ती"
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
"ती"
— by suhas suhas
एका  संध्याकाळी असंच  बसलो   होतो  दोघच.  .
अचानक  आभाळ  भरून अलं ...
लगेच ती म्हणाली  चल  पावसात भिजायला जाऊ,
आता तिला कस सांगू , प्रत्येक वेळी ढग दाटून आले म्हणजे पाऊस पडेलच अस नाही न ..
तेवढ्यात  पाऊस सुरु होणार , ती आनंदाने नाचायलाच लागणर ,
आता ती पावसात चिंब भिजणार,
मलाही मग भिजायला लागणार,
घरी गेल्यावर आई मला ओरडणार
ती मग Ice-crem चा हट्ट करणार ,
तिला मग थंडी वाजणार, तिला सर्दी होणार,
तिची तब्बेत विचारायला दिवसातून २/३ वेळा फोन , १५/२० sms करायला लागणार,
काय रे देवा.......
ती आहे  म्हणा तशी गोड ..
पण तिची नेहमी एक तक्रार, " तू माझ्यावर कविता करत नाहीस "
आता ह्या वेडीला कस सांगू कि मला कुठे येते कविता करता,
शब्द चोरतो फक्त, यमक जुळतात कधी कधी , लोक म्हणतात कविता करतो,
तरी एकदा प्रयत्न केला, तिच्यावर कविता करायचा, त्याच कोसळणाऱ्या पावसात,
ती पाऊस अंगावर घेत भिजत होती, मी मात्र वेड्यासरखा तीच्याकडे पहात ,तिच्यासाठी शब्द शोधत होतो,
त्या पावसात करायला घेतलेली कविता उन्हाळ्यात पूर्ण झाली..
धाडस करून दिली तिला कविता,
वेडी मिठी मारून रडायलाच लागली.....  
 
                                          -सुहासराजे