Reply – “ पहिला पाऊस”
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
“ पहिला पाऊस”
— by suhas suhas
बेभान वारा,
पावसाच्या धारा,
मातीचा गंध,
तीच्यासाठी मी,माझ्यासाठी ती आणी आमच्यासाठी पाऊस ,
फक्त ती,मी अन पहिला पाऊस!
तीचे लाल ओठ,
ओठांवर पावसाचं गाणं,
तिच्या हातात माझा हात,
तिला माझी सोबत अन मला तिची आणि कोसळणारा पाऊस,
फक्त ती,मी अन पहिला पाऊस!
पावसात चिंब भिजणारी ती,
तीचे गुलाबी गाल,
गालांवरून ओघळणारे पावसाचे थेंब,
तीच्यासाठी मी,माझ्यासाठी ती आणी आमच्यासाठी पाऊस,
फक्त ती,मी अन पहिला पाऊस!
तीचे काळेभोर डोळे,
डोळ्यांचे इशारे,
थंड वरा अन शहारे,
तीच्यासाठी मी , माझ्यासाठी ती आणी फक्त आमचच जग,
फक्त आणि फक्त ती,मी अन पहिला पाऊस!

                                        -सुहासराजे