Reply – ।।हसणारा चेहरा।।
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
।।हसणारा चेहरा।।
— by डॉ. सतिष पिंगळे डॉ. सतिष पिंगळे
हसणारा चेहरा हसतच असतो
त्याच्या मागच मन कोणाला कळतच नसत।
सैरावैरा मन पळतच असत
तेल संपत आलेल्या दिव्यासारख जळत असत।
सायंकाळच्या सुर्यासारख ढळत असत
विचार मनात घोळता घोळता अवकाशाच्या पोकळीत विरलेल असतात।
डोळ्यातले अश्रू मनातच ढाळत असत
ओठातले शब्द मनातल्या मनात बोलत असतो।
शरीर सुंदर हिरवळीवर नाचत असत
मन मात्र चिखलात रुतलेल असत।
पाषाणा सारख शरीर अश्रूंच्या विहिरीत भिजलेल असत
गालावरच हसु मात्र फुलतच असत।