Reply – ।। गाव ।।
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
।। गाव ।।
— by डॉ. सतिष पिंगळे डॉ. सतिष पिंगळे
पहा पहा पहा या गावात कोण कोण आले।।

आले आले आले वासुदेव आले
झोपल्यांना सर्व जागवुन गेले ।

आले आले आले पाव वाले आले
चहात खायला खारी बटर देऊन गेले ।

पहा पहा पहा या गावात कोण कोण आले ।।

कासार आले सुतार आले
न्हावी मामा आले भटजी तात्या आले
आसरोट वाले आले खेळण्या वाले आले
आपापला धंदा करून गेले ।

पहा पहा पहा या गावात कोण कोण आले ।।

गारुडि आले डोंबारी आले
जादुगार आले मदारी आले
पोपटवाले ज्योतिषी आले
गावाला कला दाखवुनी गेले।

पहा पहा पहा या गावात कोण कोण आले ।।

चोर दादा आले दरोडेखोर आले
गावाला त्यांनी लुटुन नेले ।

पहा पहा या गावात कोण कोण आले ।।

सुकट बोंबील वाले आले
मटण मच्छीवाले आले
भाजी वाले आले  
गावाला खाऊ देऊन गेले ।

पहा पहा पहा या गावात कोण कोण आले ।।

सरकारी आधिकारी आले
जमिनीचा सर्वे करुनी गेले
आमदार खासदार आले
गावात सभा घेऊन गेले ।

पहा पहा पहा या गावात कोण कोण आले ।।

लसीकरण वाले आले
बाळांना डोस देऊन गेले
शाळा मास्तर आले
धडे गिरवुन घेतले ।


पहा पहा पहा या गावात कोण कोण आले ।।

सातबारा वाले आले
गावचं घेऊन गेले ।

पहा पहा पहा या गावात कोण कोण आले ।।