Reply – कविता
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता
— by Kasturimitra Kasturimitra

अनुभवलेल्या क्षणांमधला
तो क्षण काहीसा वेगळा होता
तुझ्या पहिल्याच नजरेचा
या हृदयावर घाव होता


कित्येक पाहिल्या सुबकठेंगण्या
पण विषय वेगळा तुझाच होता
काळजाच्या ठोक्यावरती
तीर नेमका तुझाच होता


आठवणीच्या बागेतही
गुलदस्ता तयार तुझाच होता
स्वप्नातल्या दुनियेवरती
ताबाही तुझाच होता


तुझा विरह विसरताना
त्रास नेमका हाच होता
नकार ऐकण्याआधी तुझा
डोळ्यात होकार दिसत होता


प्रणव प्रभू