Reply – फक्त दोनच मिनीट थांब
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
फक्त दोनच मिनीट थांब
— by डॉ. सतिष पिंगळे डॉ. सतिष पिंगळे
प्रस्तावना:
एक व्यक्ति मृत्युच्या वाटेवर आहे, त्याला न्यायला यमदुतही आला आहे. त्यावेळी ती व्यक्ती यमदुताला विनवणी करते ती अशाप्रकारे


फक्त दोनच मिनीट थांब
मृत्यु अजुनही आहे लांब

आताच तर मी फुलायला लागलो
संसाराच्या गाड्यात रूळायला लागलो

अजुन बरचस जग बघायच आहे
मला अजुन थोडस जगायच आहे

राहिलेली स्वप्न पुर्ण करेन
मगच मी सुखाने मरेन

तेवढ्यासाठी लगेच जीव नको नेऊ
तुला मी फसवणार नाही तु नको भिऊ

तु म्हणशील याला वेळ किती पुरणार
आयुष्यभरची स्वप्ने दोन मिनटात पुर्ण कशी करणार

तु त्याची चिंता नको करु
उगीच दोन मिनीटांच स्वप्न भंग नको करु

दोन मिनटात अस स्वप्न बघेन
त्यातच मी आयुष्य भरच जगेन

स्वप्नात नरक सोडुन सगळीकडे जाईन
मला माहीत आहे यानंतर मी तेथेच राहीन

स्वर्गाची ईच्छा कधीच नव्हती तरीही तेथे जाईन
इंद्राचा दरबार डोळेभरुन पाहीन

पृथ्वीवर अडकलेला जीव असा नाही सुटणार
नात्यांचा मोह असा नाही तुटणार

त्यासाठीही वेळ द्यावाच लागणार
त्यावेळात मी त्यांच्यासाठी सर्वकाही मागणार

मुलांची शाळा, आईचा आजार
वडिलांचे प्रेम, बायकोचा बाजार

याच दोन मिनीटांच्या स्वप्नात करणार
मगच मी हा देह सुखाने सोडणार

बघितलना दोन मिनीटात काय काय केल
चित्रगुप्तालाही हिशोब लागणार नाही अस गणित दिलं

डॉ. सतिष पिंगळे