Reply – रेंज
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
रेंज
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
रोज रुटींग लाईफमध्ये; थोडा चेंज पाहिजे,
एकमेकांशी मनमोकळं बोलता येईल; अशी हृदयात 'रेंज' पाहिजे..

एकाच घरात दहा लोकांची; दहा दिशेला तोंड असतात,
वरवर सरल वाटणारे; आतून बेंड असतात..
एकत्र पंगतीत बसतानाही; फक्त मुके धोंड असतात,
संभाषण लुप्त झालेली; निरर्थक खोंड असतात..
खरंतर प्रत्येक घरात प्रत्येकाला; आयुष्य अगदी 'अरेंज' पाहिजे...

रोज रुटींग लाईफमध्ये; थोडा चेंज पाहिजे,
एकमेकांशी मनमोकळं बोलता येईल; अशी हृदयात 'रेंज' पाहिजे..!
Shashank kondvilkar