Reply – गर्भितता मनातली
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
गर्भितता मनातली
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
खूप छान लिहितोस तू; ब-याचदा ती म्हणायची;
पण गर्भितता लिखाणातली; तीच्या अंतर्मना ना कळायची..

खरंतर तीच्या अभिप्रायामुळेच; लिखाणाला नवी उर्मी मिळायची,
तीच्या सहवासात माझीच कविता; नव्याने मला उलगडायची..

आता कविता सोबत असते; पण तीची सोबत दुरावलेय,
लिहिलेल्या प्रत्येक शब्दांमधली; शाश्वतता जणू हरवलेय..
शब्दसुमनांची बरसात करणारी; आज भाषा करते जीव सलायची..

गर्भितता लिखाणातली खरंच; तीच्या  अंतर्मना ना कळायची..
खूप छान लिहितोस तू; ब-याचदा ती म्हणायची!
Shashank kondvilkar