Reply – शब्द
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
शब्द
— by डॉ. सतिष पिंगळे डॉ. सतिष पिंगळे
                                प्रस्तावना
प्रस्तुत कवितेेमध्ये शब्दांची तुलना माणसांशी केली आहे.
माणुस स्वतंत्रपणे आणि समुहात म्हणजेच समाजात वावरताना किंवा वेगवेगळ्या परिस्तिथीत वेगवेगळ्या पद्धतीने वावरतो.
याच सर्वांचा सदर कवितेत आढावा घ्येण्याचा प्रयत्न केला आहे.

हे  शब्दच विचित्र
अक्षर जेथे बनलेे  मित्र.........

तान्ह्या बाळाप्रमाणे कधी अबोल राहून बोलके 
कधी वृधासम बोलून संपलेले 
हे शब्दच विचित्र .............

शब्द गंगेहून शुद्ध, कधी सांंड पाण्याहून अशुद्ध 
कधी एकसम, कधी विरुद्ध 
कधी मैत्री, कधी घडवतात युद्ध 
हे शब्दच विचित्र ............

शब्दांना कधीच नसतो विराम
शब्दांना कधीच नसतो आराम 
कधी अश्वाहून वेगवान, कधी कुर्माहून सावकाश 
कधी गगनाहून मोठे, कधी अणुहून छोटे   
हे शब्दच विचित्र .............

कधी वज्राहून तीव्र, कधी कापसापेक्षा मऊ 
बोलणारयाची लय सांगते शब्द कोण्या अर्थाने घेवु 
हे शब्दच विचित्र ............

शब्दास नसतो बंंध, शब्दास नसतो छंद
वाक्यानेच होते एकसंध तेव्हाच येतो त्यांना गंध 
हे शब्दच विचित्र ............

सदैॆव उडती आकाशी, शोधत कविरूप पक्षी 
जो गुंफेल शब्दांची माळ, टिकवून ठेवेल निरंतर काळ 
हे शब्दच विचित्र ............

कधी व्यक्त होती वाणितन, कुणाच्यातरी गाण्यातन 
कोणत्यातरी कवितेतन, कोठेतरी ग्रंथातन 
हे शब्दच विचित्र .............
      
साहित्य म्हणजे यांचा मेळावा, स्वच्छंदपणे खेळ यांनीच खेळावा 
हेच खो देतात कोरड्या मातीला, हेच दाखवतात मातीला ओलावा 
हे शब्दच विचित्र ............

कशालाच येत नाही शब्दाची सर 
शब्द एक कर्मयोगी त्याला नसत स्वतंत्र घर     
शब्द म्हणजे त्याग वैराग्य, शब्द म्हणजे शृंगार सौख्य 
हे शब्दच विचित्र ............

शब्द अडखळतात, कधी  अडखळवतात
सत्य असत्य दोन्ही तेच, मनाला म्हणत तुझ्या परिनं वेच 
हे शब्दच विचित्र ..........

कधी एकसाथ नांदतात, कधी एकमेकांत भांडतात,
तरीही साथ सोडत नाही, मैत्रीच नात तोडत नाही
हे शब्दच विचित्र...........

कधी हसवतात, कधी रडवतात 
कधी घडवतात, कधी बिघडवतात 
कोणास ठावे शब्द कोणते नाते जडवतात
हे शब्दच विचित्र ...........

कवि.
डॉ. सतिष पिंगळे