Reply – कविता
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता
— by Kasturimitra Kasturimitra
अजूनही कळत नाही
हा असा का वागतो
आंधारातल्या सत्यावर
का नेहमीच जीव लावतो


आंधळे आहोत आपण
हे पण त्याला पटत नसत
आशेच्या हिंदोळ्यावर
नेहमीच त्याला झुलायच असत


अनुभवातून शिकायचं
त्याला कधीच कळत नाही
दुसऱ्याने तडा दिल्याशिवाय
चूक त्याला दिसत नाही


मला खरच नाही कळत
नेमकं काय तुझं गणित आहे
दुःखा शिवाय जगण
का तुला कठीण आहे


का रे मग असा
लाचार होऊन सहन करतोस
विश्वास म्हणतोस ना स्वतःला
मग का स्वतःवरच अविश्वास दाखवतोस

प्रणव प्रभू