Reply – कविता
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता
— by Kasturimitra Kasturimitra

ऐन दुपारी माझ्या पाठी
ती हळू हळू चालू लागली
समजावले तिला तरी ती
मागून मागून येऊ लागली


सूर्य हि तसा नरमलेला
पण झळ त्याची तिला लागली
झाडांच्या आडून बघता
ती हळूच लापु लागली


जाळीच्या त्या कवडशातुनी
ती स्वतःस शोधू लागली
ऊन पाहूनी मग पुन्हा
तिला माझी चाहूल लागली


रोजच्याच या खेळाची
मला आता चटक लागली
अंधारातही माझ्या मागे
ती लुप्त होऊन फिरू लागली
प्रणव प्रभू