तो येतो तेव्हा
तुझ्या आठवणी घेऊन येतो
विरहाचे सारे अश्रू
माझ्या नकळत घेऊन जातो
स्पर्श त्याचा अन भास तुझा
हाच खेळ नेहमी रंगतो
मंतरलेल्या दिवसांतला
ओला क्षण मागे पडतो
प्रयत्न अजूनही सुरु आहेत
या आठवणीतून तुला मोकळे करण्याचे
त्यालाच काहीसे वेड आहे
पुन्हा आठवणीत तुला सामवायचे
घाबरु नकोस तू आता
मी पण तेव्हढाच कट्टर आहे
साऱ्या आठवणी विसरून
आता त्याच्याबरोबर फक्त भिजणार आहे
प्रणव प्रभू