Reply – कविता
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता
— by Kasturimitra Kasturimitra

जीवनाच्या प्रवासात
अशी वेळ येणे साहजिकच आहे
दिल्या घेतल्या वचनांची
आठवण तेथे नक्कीच आहे


शोधू लागतो स्वतःला
कोठवर येऊन पोचलो आहे
हरवलेल्या वाटेवरती
का उगाच चालतो आहे


स्वप्न सत्यात उतरुनही
अश्रू का टिपतो आहे
आनंदाच्या क्षणी
दुःख का शोधतो आहे


वाटते जे मिळवले
ते खरेच का आपले आहे ?
सुंदर या जीवनाचे
सत्य नेमके काय आहे ?प्रणव प्रभू