Reply – कविता
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता
— by Kasturimitra Kasturimitra
जपून ठेवा सारे क्षण
ते कधीना कधी कामी येतील
जेव्हा एकट वाटेल तुम्हाला
तेव्हा ह्याच आठवणी साथ देतील


नाही कळणार आता तुम्हाला
हा एकटेपणा काय असतो
कितीही विसरायचं म्हटलं तरी
नेमका ऐनवेळी घात करतो


आठवणींचा गुलदस्ता
जेवढा सजवता येईल तेवढा सजवत रहा
जगणंच जेव्हा निरर्थक वाटेल
तेव्हा एक एक फुल काढून पहा
प्रणव प्रभू