Reply – कविता
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता
— by Kasturimitra Kasturimitra

मज मौज फार वाटे
जेव्हा नभी मेघ दाटे
मी पांघरून घेतो
जो शीतल वारा येतो


दाटून येतात क्षण
नयनी ओसंडते आठवण
मी पुरता हरपून जातो
तो तुषार धावून येतो


अवकाळी बरसणे तुझे
हे भान विसरणे माझे
मी धुंद होऊ पहातो
त्यात चिंब होऊनी नहातो


हे कसले वेड मजला
ते कळते फक्त तुजला
मी एकटाच भिजतो
मनी आनंद गर्दी करतो
  प्रणव प्रभू