Reply – Kavita
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Kavita
— by Kasturimitra Kasturimitra

सुखाच्या सागरात हरवण्याआधी किनाऱ्यावरील पत्थरांचे दुःख सहन करावे लागते
जगण्यातील मजा शोधण्यासाठी पहिले जगून बघावे  लागते


जीवनात असणे अन हसणे हे फारच महत्वाचे असते
असण्यातून हसणे अन हसण्यातून असणे यातूनच जगणे सजते


आनंदाचाही कहर दुःखाच्या वेशीपर्यंत नेहून सोडतो
कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी दुःखाचा गाव पटकन दिसतो


एखाद्याशी जुळणं अन एखादा कळणं यातही खूप मजा आहे
जुळणाऱ्याला कधी कळत नाही अन कळणाऱ्याशी कधी जुळत नाही


कस जगावं याचा जितका शोध घ्यावा तितका अर्थ गहिरा दिसतो
प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा त्रास तसा कमीच असतो 


          प्रणव प्रभू