Reply – Kavita
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Kavita
— by Kasturimitra Kasturimitra

नाही कळत अजुनी तुझा रुसवा कसा सोडवावा
तुझ्या शब्दांमधूनी एक एक भास हृदयात जपुनी ठेवावा


या सांजवेळी चाहूल लागता स्पंदनांनी सहवास तुझा शोधावा
तुझ्या मर्मबंधातुनी एक एक क्षण वेगळा करावा


वाट पाहण्या इतुके भाग्य या जीवनात मजला लागावे
तुझ्या येण्यामधुनी एक एक गुपित मजला समजावे


चंद्राच्या कोमल प्रकाशात हात तुझ्या हातात असावा
चांदण्याचे गोफ विणूनी एक एक तारा स्वप्नापरी तुटावा
 

या लपंडावातील ध्यास क्षणोक्षणी बहरावा
तुझ्या भेटीतला गोडवा शुक्लपक्षातील एक एक कलेसारखा वाढावा           

               प्रणव प्रभू