Reply – गणवेश
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
गणवेश
— by nilesh dattaram bamne nilesh dattaram bamne
गणवेश
आपल्याच आत्म्याचा आहे प्रतिबिंब गणवेश आपला
नसतो झाकण्या तो आपल्या शरिराची नग्नता !! धृ !!
शिकत असता शाळेत घालायचो मी गणवेश रोजच
मिरवायचो दाखवत उडालेली शाई त्यावर !! 1 !!
कवी होताच चढला कवीचा गणवेश अंगावर
झाला मग वर्षाव फक्‍त कौतुकांचा माझ्यावर !! 2 !!
पुर्वी होता गणवेश माझ्याच अंगावर गरिबीचा
काढताच तो चढला माज मलाच श्रीमंतीचा !! 3 !!
वाटले चढवावेच अंगावरी गणवेश दुसर्‍यांचे
सावरलेच पाहता मन मग त्याखालील काटे !! 4 !!
झाकतात अंग हल्ली रोज नवनवीन गणवेश माझे
उतरविता ते दिसते मला ही नग्न शरीर माझे !! 5 !!
कवी – निलेश बामणे
92-7 तुषार हिल वेल्फेअर सो. श्रीकृष्ण नगर, संतोष नगर,
जन. अ.कु.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ) ,
मुंबई- 65.
मो. 9029338268