Reply – poem-kavita
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
poem-kavita
— by JAYANT GORE JAYANT GORE
कविता:-
कवितेने हुरूप यावा जगण्याचा
कवितेने अनुभव यावा एकाग्रतेचा !!
कवितेने ठसा उमटवावा सातत्याचा
कवितेने भाव आणावा आनंदाचा !!
कवितेने उलगडावा पट शब्दांचा
कवितेने दूर सारावा पडदा कारुण्याचा !!
कवितेने वर्षाव व्हावा कौतुकाचा
कवितेने आदर व्हावा रसिकजनांचा !!
कवितेने विकास करावा कल्पनाविलासाचा
कवितेने शांत करावा आत्मा वाचकजनांचा !!-जयंत