Reply – poem-hurhur
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
poem-hurhur
— by JAYANT GORE JAYANT GORE
हुरहूर :-

उद्या तू भेटणार म्हणल्यावर
 भरून आला माझा ऊर
किती बोलू किती नको
म्हटले ठरवू भेटल्यावर !!

आठवणींचा ओसंडू लागला पूर
 कसे सांगू किती सांगू
परी मनी असे हुरहूर
किती आठवतील वेळेवर !!

तुला दिसावे चांगले म्हणून
 कपड्यांना इस्त्री केली दिवसभर
कुठले घालू कुठले नको
 ह्यातच निघून गेला वेळ भरपूर !!

ऐन वेळेला पंचाईत नको म्हणून
 मनाची तयारी केली रात्रभर
काय वाटेल कसे वाटेल
 ह्याच विचारात मन झाले चूर !! - जयंत