Reply – पाऊस
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
पाऊस
— by nilesh dattaram bamne nilesh dattaram bamne
पाऊस

मुंबईत
कंठाशी आलेला मुंबईकरांचा जीव
पाऊस कोसळायला लागताच
एकदाचा भांड्यात पडला ...

मुंबईत
आता पाणी टंचाई आणि घामाच्या धारांपासून
मुक्ती मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आनंद
मुंबईकरांनी पाऊसात भिजूनच व्यक्त केला ...

मुंबईत
इतके दिवस ओस पडलेल्या
छत्र्यांच्या दुकानात आता कोठे
छत्र्या विकत घेण्यासाठी घोळका दिसू लागला ...

मुंबईत
आता कोठे काळ्या पडलेल्या
मुंबईकरांच्या चेहऱ्यांवर
पावसाळा दिसू लागला ...

मुंबईत
प्रेमिकांना एकत्र पावसात भिजत फिरताना
मिळणारा स्वर्गीय आनंद बरयाच
प्रतीक्षेनंतर का होईना मिळाल्याचा आनंद झाला ...

मुंबईत
अचानक वातावरणातील अव्यक्त चिडचिड
नाहीशी होऊन सर्वत्र गारवा पसरला आणि
मुंबईकर खऱ्या अर्थाने पाऊसाच्या स्वागताला तयार झाला ...

कवी - निलेश बामणे ( एन .डी .)