Reply – मी
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
मी
— by nilesh dattaram bamne nilesh dattaram bamne
मी

विसर का पडतो मला पाहता चोरून मी तुझ्याकडे

एकदा तरी वळूनच पाहण्याचा या जगाकडे

पाहतच का राहतो मी तुझ्या ग रेशमी केसांकडे

आकर्षितते का मन त्यांच्या काळ्या रंगाकडे

वळुनीच पाहणारे घारे तुझे डोळे माझ्याकडे

घालतातच का मला क्षणोक्षणी एक नवे कोडे

हसते का गाली तू पाहत वेड्यागतच माझ्याकडे

पाहता हरवून मी तुझ्या सुंदर चेहर्‍याकडे

निघताना जेंव्हा तू पाहतेस वळूनच माझ्याकडे

तेंव्हाच माझी नजर वळ्ते सहज दुसरीकडे

कवी- निलेश बामणे ( एन.डी.)